सत्ता जशी गेली तशी परत येईल- जयंतराव पाटील
टॅक्स सरकार गरीबाची लूट करत आहे
आटपाडी प्रतिनिधी
करगणी ता. आटपाडी येथे क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ माजी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल माजी पालकमंत्री जयंतराव पाटील यांचा सन्मान करण्यात आला.




यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की या टॅक्स सरकारने गरिबांची लूट सुरू केली आहे .सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा या टॅक्स सरकारला जनतेने हाकलून दिले पाहिजे व भविष्यामध्ये हे टॅक्स सरकार लवकरच जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळेला विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले नरवीर उमाजी राजे नाईक यांचे विट्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये स्मारक उभारणार असल्याची ग्वाही येथील रामोशी समाजांना दिली .
भारततात्या पाटील म्हणाले खानापूर आटपाडी मतदारसंघ राष्ट्रवादीमय व्हावा त्यासाठी साहेब तुम्हीच या मतदारसंघाचे नेतृत्व करावे. ,वंचित घटकांचा समाज मागे टाकला होता. अशा समाजाला जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस एन. पी. खरजे म्हणाले की अनेकांनी टेंभू योजनेला खोडा घातला, धनगाव योजनेला घोडा घातला, आणखी काही गावे काही टेंभू योजनेपासून वंचित आहेत, या गावांना साहेबांनी लवकरच न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली.
उमाजी नाईक समाज धारक मंडळा चे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी रामोशी समाजाच्या व्यथा मांडल्या व वचनाला जागणारा रामोशी समाज आज अनेक योजना पासून वंचित आहे. त्यांना शासनाच्या योजना देऊन त्यांचा विकास झाला पाहिजे ,अशी मागणी माजी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्यासमोर मांडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, युवा नेते सौरभ पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख , राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष अनिता पाटील, युवती अध्यक्ष पूजा लाड ,ओबीसी चे नेते सादिक खाटीक, भीमराव होनमाणे पंच ,युवकचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, अध्यक्ष जालिंदर कटरे, उपाध्यक्ष दत्तात्रय यमगर, युवा नेते रोहित देशमुख, सरपंच परशुराम सरक, अशोक लवटे, जितेंद्र जाधव ,रवींद्र लांडगे, रामभाऊ मंडले,प्रशांत पाटील,किशोर गायकवाड, मदन जविर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.







