धनदंडग्यांनी अन्नधान्याच्या अनुदानापासून बाहेर पडावे -तहसीलदार बि एस माने यांचे आव्हान
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये कार्यरत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना कार्ड संख्या 22110 इतकी असून एकूण1,02413 एवढ्या व्यक्तींना या योजनेतून 2 रुपये प्रति किलो दराने गहू व 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ याप्रमाणे प्रतिव्यक्ती 5 किलो धान्याचा लाभ मिळतो.
तसेच अंत्योदय योजनेमधून एकूण 1733 इतकी कार्ड संख्या असून या योजनेतून 2 रुपये प्रति किलो दराने 15 किलो ग्रॅम गहू व 3 रुपये प्रति दराने 20 कि. ग्रॅम तांदूळ याप्रमाणे 35 किलो धान्याचा लाभ मिळतो
पीओएस मशीन मधून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सर्वसाधारणपणे मासिक 572 मे ट्रन धान्य व्यतिरिक्त केले जाते.
तालुक्यामध्ये जरी अन्नसुरक्षा योजनेमधील इन्स्टंक पूर्तता पूर्ण झालेली असली तरी असे निदर्शनास आले आहे की जे खरोखरच गरजू गरीब आहेत, हात गाडीवाले, कचरा वेचणारे, भूमीहीन, अल्पभूधारक ,कामगार ,अन्य उत्पन्न गटातील कुटुंबे ,विधवा परिसत्वता ,ग्रामीण कारागीर ,झोपडपट्टीतील लोक हमाल आहेत त्यांना या योजनेचा लाभ देणे जरुरीचे असताना अध्याप काही कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्यांचे उत्पन्न वाढले आहे ,अशा लाभार्थीने सोइच्छेने सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली तर अशा लाभार्थ्यांना मिळणारा सवलतीचा लाभ जे गरजू आहेत त्यांना होऊ शकतो.
अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे यांचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 44 हजार इतके अथवा त्यापेक्षा कमी व शहरी भागामध्ये 59 हजार इतके अथवा त्यापेक्षा कमी असा निकष पात्र असून या लावा पासून वंचित आहेत त्यांना अन्नधान्याचा लाभ मिळू शकतो.
सद्यस्थितीमध्ये अन्नसुरक्षा योजनेमधील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर वकील स्थापत्य विशारद चार्टर्ड अकाउंट आहेत, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती व्यवसाय कर विक्रीकर किंवा आयकर भरतात तसेच चार चाकी यांत्रिक वाहन आहे, ज्यांच्याकडे बंगला आहे, ज्यांचे कुटुंब पेन्शनधारक अथवा नोकरदार व्यक्ती आहेत व ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागामध्ये 44 हजार पेक्षा जास्त व शहरी भागामध्ये 59 हजार पेक्षा जास्त आहे. त्यांनी या योजनेतून बाहेर पडावे
दिनांक 19/ 10 /2016 रोजी च्या शासन निर्णयानुसार अन्नधान्याच्या अनुदानापासून बाहेर पडा या योजनेत समाविष्ट होणे कामी अशा व्यक्तींनी मोठ्या मनाने बाहेर पडून जे गरजू वंचित आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत करावी.
या योजनेतून बाहेर पडण्यासाठी रेशन दुकानदार यांच्याकडे 26 ऑगस्ट 2022 अखेर अर्ज जमा करण्याचे आहेत. तालुक्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेतील सदन लाभार्थींनी अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा या मोहिमेत जास्तीत जास्त सहभागी होऊन गरीब व गरजू लोकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे आव्हान तहसीलदार बी.एस. माने यांनी केले आहे.







