अन्यथा मनसेचा रस्त्यावरील संघर्ष अटळ!
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच आपण जल्लोषात साजरा केला मात्र अजुनही जनतेला पायाभुत सुविधासाठी संघर्ष करावा लागतो ही प्रचंड लाजिरवाणी गोष्ट आहें.
कित्येक वर्षे पात्रेवाडी- तळेवाडी- करगणी , तसेच करगनी – शेटफळे- चिंध्यापीर हें रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेटफळे , करगनी,पात्रेवाडी, माळेवाडी ,तळेवाडी , येथील जनता तसेच परगावी प्रवासी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डयामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातच पाऊसाचे पाणी साचत असल्याने त्यातून मार्ग काढत जाणे वाहन चालकाला अवघड झाले आहे. हें रस्ते अपघाताला आमंत्रण देणारे असून मृत्यूचा सापळा बनला आहे. तातडीने सर्व रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सतत करीत आहोत.
ग्रामस्थांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधीना सांगितले, पत्र पाठवून पाहींले परंतु ग्रामस्थांच्या या तक्रारीची कोणीच नोंद घेतली नाही. शेटफळे ते करगणी हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता आहे. ठेकेदार दर्जाहीन रस्ते बनवतात त्यामुळे दोषदायित्व कालावधी च्या अगोदरच रस्त्यांची चाळन होतें.
राज्यमार्ग १५३ चे काम सुरु असताना या मार्गावरून ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक केली. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची अवजड वाहने नेल्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्नशील आहोत.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी वर्ग यांनी आता विलंब न करता तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे नाहींतर मनसेला पुन्हा एकदा निष्क्रिय लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास भाग पाडू नये.
– *राजेश रामचंद्र जाधव*
*मनसे जिल्हा सचिव, सांगली*
*९६६५८८००९९*







