मॅरेथॉन स्पर्धेत जयभवानी विद्यालयाची यशाला गवसणी
स्वात़ंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निमीत्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन गुरूवारदिनांक १८अॉगस्ट २०२२ रोजी करण्यात ठिक सकाळी ६:०० वाजता क्रीडा संकुल दहिवडी येथे आयोजक श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था ,मर्या.दहिवडी, उपविभागीय कार्यालय माण-खटाव.सहायक निबंधक सहकारी संस्था,माण, हरित वसुंधरा टीम दहिवडी यांच्या वतीने आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पाडण्यात आल्या मॅरेथॉन स्पर्धा १८ते ३०वर्ष ३१ते ५० वर्षे व ५१ ते ६० वयोगटात आयोजीत करण्यात आलया होत्या सदर स्पर्धेत तालुक्यातील बहुसंख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता

सदर स्पर्धेसाठी कै.आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळ मार्डी द्वारा संचालित जय भवानी विद्यालय पिंगळी बु च्या उपशिक्षीका सौ.जयश्री दिपक निकम यांनी३१ ते ५० वर्ष वयोगटात ५ कि.मी मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल संस्था मार्गदर्शक व संचालक श्री.संदीप(दादा) पोळ,जय भवानी विद्यालय पिंगळी बु चे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,विद्यार्थी वर्ग सर्वांनी अभिनंदन केले आहे







