आटपाडी तालुक्यातील टेंभू उपसा बंदिस्त पाईपलांचे काम निष्कृष्ट दर्जाचे— विठ्ठल पडळकर
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील लघु पाटबंधारे टेंभू योजनेअंतर्गत झरे -दिघंची, पिंपरी -निंबवडे, घाणंद या बंदच्या कामाची चौकशी करण्यात यावी सदर काम हे निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे. बंदिस्त पाईपलांची शासकीय नियमानुसार आवश्यक असणाऱ्या खोलीपेक्षा कमी खोलीकरण झाले आहे. या संपूर्ण कामाची चैकशी व्हावी अशी मागणी माजी सरपंच विठ्ठल पडळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की बऱ्याच ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन वरती मुरूम टाकून त्याची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सदरचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जेत झाले आहे. याबाबत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण झाली असावी असे मत सरपंच विठ्ठल पडळकर यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे .
तसेच पडळकरवाडी, पिंपरी बुद्रुक, परेकरवाडी या गावच्या अनेक शेतकऱ्यांच्या कालव्यातून भूसंपादन केलेल्या जमिनीचे खरेदी दस्त करण्यासाठी आम्ही वारंवार टेंभू कार्यालयात गेलो असता आमची कोणतेच कारण ऐकून घेतले जात नाही .
सदरचे काम करण्याकरता आम्हाला आर्थिक मागणी करण्यात येत आहे. अन्यथा दस्त होणार नाही असे सांगितले जाते त्यामुळे या कार्यालयाचे कनिष्ठ वरिष्ठ अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व माजी सरपंच विठ्ठल पडळकर यांनी केली आहे .
याबाबत मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी ,कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे टेंभू योजना सांगली ,(वारणाली ),जलसंपदा कार्यालय सांगली व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.







