प्राची काबुगडे हिचे तालुकास्तरीय गायन स्पर्धेत यश
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी येथील श्रीराम कॉलेज येथे जिल्हा परिषद आयोजित तालुकास्तरीय गायन स्पर्धा पार पडल्या .
या गायन स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन निंबवडे ची विद्यार्थिनी कुमारी प्राची ब्रह्मदेव काबुगडे हिने सहावी ते आठवी या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला .तिची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे .तिला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .विजया तारळेकर,श्री सचिन देठे,बापूसो औंधकर,शैलजा औंधकर,विजय चव्हाण,प्रमोद देठे,मोनाली खाडे या सर्व शिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभले .
तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी,विस्ताराधिकारी,केंद्रप्रमुख,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थ या सर्वांनी अभिनंदन केले व जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .







