धावडवाडी ग्रा.पं.सदस्य युसूफ शेख यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा धावडवाडी येथे खाऊ वाटप.
माणगंगा न्यूज पोर्टल जत,धावडवाडी:- ग्रामपंचायत सदस्य मा. युसूफ शेख यांच्या वाढदिवसानिमित्त जि. प. शाळा धावडवाडी येथे खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी नदाफ सर यांनी प्रास्ताविक केले. काही कारणास्तव युसूफ शेख हे या कार्यक्रमाला हजर राहू शकले नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे पडोळकर सर, नदाफ सर, वाघमोडे मॅडम, विजापुरे मॅडम,अंगणवाडी सेविका शेख मॅडम व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.







