झरेतील तलाठी कार्यालयात झिरो तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची लुट–संपुर्ण कार्यालय झिरो तलाठ्यांच्या ताब्यात,तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष
आटपाडी तालुक्यातील झरे येथील तलाठी कार्यालयामध्ये गाव कामगार तलाठी कधीतरी हजर असतात. तर या गाव कामगार तलाठी कार्यालयाचा संपूर्ण कार्यभार झिरो तलाठी सांभाळतात. असे अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी झाल्या परंतु महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी सातबारा, खाते उतारे व अन्य उतारे ,दाखले काढावे लागत असतात .किंवा खरेदी ची नोंद करणे ,बँक बोजा चढवणे, बँक बोजा कमी करणे, वारस नोंद करणे अशा अनेक नोंदीसाठी झिरो तलाठ्याकडून आर्थिक पिळवणूक होत आहे .
याबाबत अनेक शेतकऱ्यांनी गाव कामगार तलाठ्याकडे तक्रारी करून सुद्धा गावकामगार तलाठी याची दखल घेत नाहीत.
शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करून कसातरी जीवन जगत असतो. परंतु त्याची किंमत झिरो तलाठ्यांना समजत नाही. या झिरो तलाठ्यांच्या अनेक वेळा तक्रारी गाव कामगार तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांनी केल्या परंतु त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. तरी गाव कामगार तलाठी यांच्या कार्यालयातील झिरो तलाठी यांनी मांडलेला बाजार बंद करावा व शेतकऱ्यांची नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
झिरो तलाठ्यांना पैशाची लेन देण केली नाही तर शेतकऱ्याच्या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे गहाळ करतात. ती कागदपत्रे गहाळ न होता झिरो तलाठी ती कागदपत्रे दडवून ठेवतात व माझ्याकडून गहाळ झाली असे सांगतात. आणि पुन्हा शेतकऱ्यांना दुसरी कागदपत्रे आणा असे सांगितले जाते. म्हणजे एक तर शेतकरी स्वतःचं कुटुंब कसं तरी चालवत असतो, आणि त्यामध्ये या झिरो तलाठ्याकडून आर्थिक लूट होत असते, यावर कोणी निर्बंध घालेल का ? याची कोणी दखल घेईल का ? असा गंभीर प्रश्न या परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
वरील सर्व प्रकरणाबाबत
तसेच अनेक वेळा झिरो तलाठी सातवार्यामध्ये काही प्रमाणात चुका करतात व पुन्हा दुरुस्त करण्यासाठी त्या शेतकऱ्याकडून आर्थिक लूट करतात अशी या परिसरामध्ये अनेक प्रकरणे आहेत
वरील सर्व प्रकरणाबाबत लेखी व तोंडी अनेक पुरावे आहेत







