श्री. म. द. भारती कन्या शाळेत, मुलींना सायकलींचे वाटप
दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री. म. द.भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आर्णी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री रवीशेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नळे सर, संस्थेच्या संचालिका आशाताई भारती मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर, प्रा. सुभाष जाधव सर, सौ. पिस्तुलकर मॅडम, सौ कचरे मॅडम, सौ नीलावर मॅडम, सौ. डोकडे मॅडम, श्री गोंडणे सर, बाजरी पलिकोंडावार सर, लिपिक किरणभाऊ पाटील, शिपाई विजुभाऊ नेवारे, सर्व शिक्षक बंधू – भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या जयंतीनिमित्त “मानव विकास मिशन अंतर्गत” गरजू व होतकरू, जवळपास 52 मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन श्री मनोज सहारे सर यांनी केले.







