• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सकारात्मक विचार हेच यशाचे खरे गमकमा.आर.एस.चोपडे….नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयाचे यश कौतुकास्पदमा. ब्रम्हानंद पडळकर

माणगंगा by माणगंगा
October 11, 2022
in सांगली
0
सकारात्मक विचार हेच यशाचे खरे गमकमा.आर.एस.चोपडे….नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयाचे यश कौतुकास्पदमा. ब्रम्हानंद पडळकर

सकारात्मक विचार हेच यशाचे खरे गमक
मा.आर.एस.चोपडे

नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालयाचे यश कौतुकास्पद
मा. ब्रम्हानंद पडळकर

महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. ता. आटपाडी, जि. सांगली या महाविद्यालयांमध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन, आर एस चोपडे सर, प्रमुख पाहुणे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, संस्थेच्या संचालक मंडळातील विविध पदावर कार्यरत असणारे पदाधिकारी तसेच झरे गावचे सरपंच अधिकराव माने, आटपाडी पंचायत समितिचे माजी सभापती, नारायण चवरे, गावातील पालक विद्यार्थी व सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीचा वाढता आलेख महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर एच पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. संस्थेचे चेअरमन चोपडे सर यांनी प्राचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमी मानधन आणि अल्प सोयीसुविधा असताना हे यश संपादन केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आता प्रगतीच्या मार्गावर आहेत असं म्हणावसं वाटतं कारण आजचा पालक सुशिक्षित आणि सुजाण झाला आहे. त्यामुळे आपल्या मुला – मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी तो प्रयत्नशील असलेला दिसतो आहे. संस्थेतील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी अधिकार पदावर कार्यरत असताना दिसतात, सकारात्मक विचार हेच यशाचे खरे गमक आहे हे महाविद्यालयरुपी रोपट लावण्याचे काम आम्ही केले आहे त्याचा वटवृक्ष होताना दिसतोय पण त्याची मूळ अधिक मजबूत करण्याचं काम हे विद्यार्थी प्राध्यापक आणि परिसरात असणाऱ्या शिक्षण प्रेमींनी करावं असं अहवान आपल्या भाषणाच्या शेवटी चेअरमन चोपडे सरांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रह्मानंद पडळकर यांनी लहान वयात मुलींची लग्न करणे ही प्रथा बंद करून पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि मुलींनीही पण लग्नाला लगेच होकार न देता मला शिकायचं असेल शिकायचं आहे असं ठणकावून सांगितलं पाहिजे तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर यांचे विशेष अभिनंदन करतो की त्यांना सलग तीन वर्ष शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम क्रमांक मिळतो आपण बघतोय की इतके चांगले पगार इतर सोयी सुविधा असताना इतर महाविद्यालयांच्या तुलनेत हे यश कौतुक करण्यासारखं आहे पाटील सर आणि त्यांच्या टीमने हे अवघड काम करून दाखवलं आहे

इथून पुढे आम्ही मदतीच्या वेळी नेहमी त्यांच्यासोबत राहू असे आश्वासनही त्यांनी दिलं. माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी मी सदैव तुमच्या सोबत राहील असे आश्वासन दिले. संस्थेचे जेष्ठ सल्लागार कदम एस.के.सर यांनी महाविद्यालयाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालयाच्या सोयी सुविधांना आपला हातभार लागावा यासाठी १०,०००/- रुपयांचा धनादेश माननीय प्राचार्य पाटील सर यांच्याकडे सुपूर्द केला.

संस्थेचे जेष्ठ सल्लागार ए.एम. वाघमोडे सर यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. चेअरमन चोपडे सरांच्या मार्गदर्शनाखाली संस्था महाराष्ट्राच्या पटलावर पोहोचली आहे त्याचा आम्हा मंडळींना सार्थ अभिमान वाटतो.

उपस्थित संस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती, एल.टी.शेंडगे मॅडम, संचालक, आर.डी. शेंडगे, ए.एस. पडळकर, यु.सी.नलवडे, डी.के. हेगडे, संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख व संचालक, लुनेश विरकर, समन्वय समितीचे अध्यक्ष, डी.ए.वाघमोडे कार्यवाह, बी.पी.सरगर, विविध शाखांचे मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रा.खिलारी व्ही.ए. प्रा.पाटील एन.डी., प्रा.एम.डी.खांडेकर, प्रा.एस.डी मुलानी, प्रा.आर.एस. चौगुले, प्रा.सौ.घुटूकडे एम. आर., श्री.फकीर जे.जे., श्री. नरळे एम.पी. हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. काळेल आर.व्ही. यांनी केले, तसेच आभार प्रा. डी. एस. देवकुळे यांनी मानले.

Views: 198
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नियमित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वैतागवाडी येथील शेतकऱ्यांचे 33 केवी केंद्रासमोर उपोषण……आम आदमी पार्टीचा उपोषणास पाठिंबा

नियमित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी वैतागवाडी येथील शेतकऱ्यांचे 33 केवी केंद्रासमोर उपोषण......आम आदमी पार्टीचा उपोषणास पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)