निंबवडे येथे मेंढ्याच्या कळपावर वीज पडून तीन मेंढ्यांचा मृत्यू
आटपाडी प्रतिनिधी
निंबवडे ता. आटपाडी येथील लक्ष्मी नगर परिसरात वीज कोसळून तीन मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे .सोमवारी दिवसभर तालुक्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले होते. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये विजांचा मोठा कडकडाट पाहायला मिळाला निंबवडे येथील लक्ष्मी नगर परिसरात अंकुश रामचंद्र गळवे यांच्या मेंढरांचा कळप आटपाडी निंबवडे मार्गावर चरण्यासाठी सोडण्यात आला होता
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट सुरू झाला साधारणपणे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांचा मोठा कडकडाट होऊन मेंढेच्या कळपावर वीस कोसळली त्यामध्ये तीन मेंढ्या ठार झाल्या असून. रात्री उशिरापर्यंत तालुक्यामध्ये ठीक ठिकाणच्या भागांमध्ये विजांचा कडकडाट व पावसाने हजेरी लावली.







