निंबवडेत आम.गोपीचंद पडळकर व सभापती पुष्पाताई सरगर यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा.
निंबवडे ता आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर व सभापती पुष्पा जयवंत सरगर, यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध कामाचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती पुष्पा ताई सरगर यांचे हस्ते पार पडला
यावेळी जि प सदस्य अरुण भाऊ बालटे, उपसभापती रुपेश कुमार पाटील, अनिल पाटील, जयवंत भाऊ सरगर, मार्केट कमिटी चे माजी संचालक विष्णुपंत अर्जुन, ज्येष्ठ नेते शिवाजी मुढे, सरपंच नंदा देठे, माजी. सरपंच धुळा दादा देवडकर, मंगेश मगदूम, उपसरपंच धोंडीराम मेटकरी, ग्राप सदस्य विक्रम देवडकर, ग्रा प सदस्य कुंडलिक पिंजारी व अनसेवाडी, निंबावडे, यशवंतनगर येथील मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पुढील प्रमाणे करण्यात आला आ. गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक जनसुविधा योजनेतून बिरोबा मंदिरासमोरील पेंव्हिग ब्लॉक -६ लाख रुपये, सभापती पुष्पाताई जयवंतभाऊ सरगर यांच्या स्थानिक विकास निधीतून अनुसेवाडी येथे वाॅटर एटीएम -३ लाख ६५ हजार रुपये ,सभापती पुष्पाताई जयवंतभाऊ सरगर यांच्या स्थानिक विकास निधीतून अनुसेवाडीसह रानमळा येथे १६ सोलर दिवे बसविलेआले-, अनुसेवाडी जि.प शाळा येथे ५००० लिटर पाण्याची टाकी -१ लाख २५ हजार रुपये, ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगातुन अनुसेवाडी येथे प्रभात फेरी सिमेंट क्रॉक्रीट रस्ता -४ लाख ७० हजार रुपये
वरील विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.







