दुष्काळी भागाची जीवनदायीनी सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे मोळीपुजन संपन्न
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-
सातारा, सोलापुर,सांगली या तीन जिल्ह्याच्या सिमारेषेवर व दुष्काळी आटपाडी तालुक्याच्या सरहद्दीवर मोठ्या दिमाखात उभा असणारा सदगुरु श्री श्री साखर कारखाना 11 वा गळीत हंगाम व मोळीपुजन माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आटपाडी चे आमदार अनिल बाबर, माणचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार रामहरी रुपनर,प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढेकर,गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापुर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव व्हा. चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील,कार्यकारी संचालक उदय जाधव, उषाताई मारकड, मोहन बागल,श्रावण वाकसे, उत्तम खांडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक उदय जाधव यांनी केले तर ,सुत्र संचालन केन मॅनेजर सुनिल सावंत यांनी केले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले कारखान्याला भेडसावत असणारी रस्त्याची समस्या लवकरच दुर करु अशी ग्वाही आमदार जयकुमार गोरे केली. सद्गुरु मुळे आसपासच्या भागाचा कायापालट झाल्याचे माजी रामहरी रुपनर यांनी सांगितले. आजच्या मोळीपुजन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभासद शेतकरी,वाहनमालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते







