आटपाडीच्या तहसीलदार बी. एस. माने यांच्या चौकशी साठी हंबीरराव जावीर यांचे उपोषण जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे
गोमेवाडी ता.आटपाडी येथिल ग्रामपंचायत सदस्य हंबीरराव(अर्जुन) जावीर यांनी आटपाडीच्य तहसीलदार बी.एस. माने ह्या अवैध वाळू चोरी विरोधात कारवाई करत नाहीत. असा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते याची दखल जिल्हा खनिक्रम अधिकारी अमर देवकर यांनी प्रांताधिकारी यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर हंबीरराव (अर्जुन)जावीर यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.
हंबीरराव (अर्जुन)जावीर यांनी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी वाळू तस्करी ची तक्रार तहसीलदार बी.एस. माने यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी अर्वाच्य भाषा वापरून अपमान जनक वागणूक दिली असल्याने या बाबतीत बी.एस .माने यांची चौकशी करावी अन्यथा 12 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारदार हे स्वतःच मोटरसायकल वरून वाळूची तस्करी करतात स्वतःच्या फायद्यासाठी प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या विरोधात खोटी तक्रार करीत आहेत, हंबीरराव(अर्जुन) जावीर हे मोटरसायकल वरून 250 रुपयाला एक पोते वाळू विकतात.
तहसीलदार – बी.एस.माने
तहसीलदार बी एस माने यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाबद्दल मी कधीही नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे. तर तहसीलदार बीएस माने यांचीही नार्कोटेस्ट करावी.
हैबतराव जावीर -गोमेवाडी ता.आटपाडी







