म्हसवडची कॉरिडार कुठेही गेलेलीच नाही
-आमदार जयकुमार गोरे
म्हसवड,ता.12:”म्हसवडची बेंगलोर मुंबई इडस्ट्रीयल कॉरिडार कुठेही गेलेली नाही,ती म्हसवड मध्येच साडेआठ हजार एकरात होणार आहे.
जर कोणी कॉरिडॉर एमआयडीसी गेली असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांच्यावर विस्वासच ठेऊ नका” असे आवाहन माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

राजेवाडी येथील सदगुरु श्री. श्री. साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात आमदार गोरे बोलत होते.
यावेळी माढा मतदार संघाचे खासदार रणजित निंबाळकर,आमदार अनिल बाबर,माजी आमदार रामहरी रुपनवर,गुरुदेव शिवाचार्य प्रभू महाराज,शिवाचार्य माढेकर महाराज,गुरुदेव श्री.श्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर,आप्पासाहेब पुकळे, संपतकाका पवार,डॉ.महादेव कापसे,दिलीप तुपे, कारखान्याचे संचालक इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
श्री गोरे पुढे म्हणाले की,म्हसवड येथे बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीज कॉरिडॉर मंजूर झाली आहे.या कॉरिडॉरसाठी दोन्ही बाजूंनी सुसज्ज रस्ते असुन या कॉरिडॉरचा सातारा, सांगली, व सोलापुर या तिन जिल्ह्यास फायदा निश्चितच होणार आहे.इंडस्ट्रीज कंपन्या येणार असुन या भागाचा कायापालट होणार आहे.
यावेळी खासदार रणजित निंबाळकर यांनीही माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता म्हसवडची कॉरिडॉर आम्हीच कोरेगाव भागात नेहली असल्याचे बोलघेवडे प्रचार करीत असल्याची टिका करुन खरपुस भाषेत समाचार घेतला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी म्हसवड भागात मंजूर झालेली बेंगलोर मुंबई कॉरिडॉर इतरत्र जाऊ देऊ नये असे साकडे उपस्थितांना घालुन म्हसवड भागात जर कॉरिडॉर ऊभारली गेली तर माण,आटपाडी,सांगोला,माळशिरस या तालुक्यांचा विकास होईल असे मत व्यक्त केले.
श्री रामहरी रुपनवर यांनीही बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मुळे सातारा, सांगली,सोलापुर या तिन्ही जिल्ह्यास निश्चितच फायदा होईल यासाठी या तिन्ही जिल्ह्यातून एकत्रितपणे प्रयत्न करुया असे आवाहन केले.
चौकट
कार्यक्रम सदगुरु श्री.श्री.साखर कारन्याच्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभांचा होता मात्र या कार्यक्रमात माणदेशातील म्हसवड, मासाळवाडी,धुळदेव,गारवड नियोजित बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ऊत्त कोरेगाव भागात स्थलांतर विषयावर उपस्थित मान्यवरांची भाषणेच रंगदार व लक्षवेधी अशी ठरली.या कार्यक्रमात माण देशातच म्हसवड,मासाळवाडी धुळदेव गारवड येथे नियोजित कॉरिडॉर व्हावा तो ऊत्तर कोरेगाव भागात स्थलांतर करु नये या मागणीसाठी माणदेश म्हसवड कॉकिडॉर बचाव संघर्ष समितीचे आंदोलन कर्ते डॉ.महादेव कापसे दिलीप तुपे व गारवड येथील कार्यकर्तेही या कार्यक्रमास उपस्थित होते.
छायाचित्र
राजेवाडी – म्हसवड,मासाळवाडी,धुळदेव गारवाड येथील नियोजित बेंगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर मध्ये माळशिरस तालुक्यातील वगळण्यात आलेल्या गारवाड गावाचा समावेश करावा या बाबतचे निवेदन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर,आमदार जयकुमार गोरे यांना देताना श्री बाळासाहेब कर्णवर पाटील,अमोल यादव ओबीसी नेते सोमनाथ पिसे, शिवराज पोकळे आदी.







