आटपाडी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आम. गोपीचंद पडळकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आटपाडी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी वेळी आमदार पडळकर यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हा सचिव तात्यासाहेब मंडले, आटपाडी तालुका अध्यक्ष- किरण पाटील ,उपाध्यक्ष- अविनाश शिंदे, सचिव- गणेश देवडकर, खनिजदार -विजय मोटे, सुनिल गायकवाड, सुनिल पुजारी, महादेव गळवे,हणमंत गळवे, शिवाजी खटके, अजिनाथ सावत,पोपट पारेकर, बापू झंजे, कुमार हातेकर , प्रवीण तोरणे ,जहांगीर मुजावर ,तातोबा यमगर उपस्थित होते.







