झरे परिसरात वादळ वाऱ्याने ऊस भुई सपाट
आटपाडी प्रतिनिधी


झरे परिसरामध्ये विभूतवाडी, कुरुंदवाडी येथील शेतकऱ्यांचे ऊस वादळ वाऱ्यामुळे भुई सपाट झाले आहेत. सतत रिमझिम पाऊस व त्यामध्ये वादळ झाल्याने भीमराव बाळू खताळ, नारायण भीमराव खताळ यांचे विभूतवाडी हद्दीमध्ये तर आप्पा सुदाम खताळ यांचे कुरुंदवाडी हद्दीमध्ये ऊस भोईसपाट झालेआहेत. तरी सदर भोईसपाट झालेल्या उसाचे पंचनामे होऊन भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
याबाबत कृषी मंडल अधिकारी व तहसीलदार बी.एस. माने यांना फोनवरून कळविण्यात आले आहे.







