आटपाडीतील अजब कृषी कार्यालयाचा गजब कारभार,
तालुका कृषी अधिकाऱ्यांचा कृषी सहाय्यकावर कमांड नाही.
फळबाग लागवड करणारे शेतकरी कुशलच्या बिलापासून वंचित.

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचा कृषी सहाय्यक अधिकाऱ्या वरील कमांड सुटला .
तालुका कृषी अधिकारी यांचा कृषी सहाय्यक वरील वचक संपला आहे असे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने फळबाग लागवडीसाठी अनुदान येत असते परंतु कृषी सहाय्यकाच्या निष्काळजीपणामुळे शासनाने दिलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहू लागले आहेत .
फळबाग लागवडीसाठी दोन पद्धतीने अनुदान मिळते. पहिली पद्धत म्हणजे रोजगार हमी योजनेतून मजुरांच्या नावावरती पैसे येतात , तर दुसरी पद्धत म्हणजे शेणखत,रासायनिक खते व इतर बिले कुशलच्या माध्यमातून निघतात.
परंतु कृषी सहाय्यकाच्या निष्काळजीपणामुळे कुशलच्या बिलापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. कुशल ची बिले तयार करत असताना शेणखताच्या पावत्या व रासायनिक खताच्या पावत्या जोडाव्या लागतात. परंतु कृषी सहाय्यक यांनी मी सर्व पावत्या जोडलेले आहेत असे शेतकऱ्यांना सांगितले, परंतु त्यांनी कोणतीही पावती जोडली नाही, त्यामुळे फक्त रोपवाटिका ची बिले निघणार असून शेतकऱ्यांनी रासायनिक व शेणखत घातलेले आहे याची बिले निघणार नाहीत .त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. अशा या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीकडे कसा काय वळणार ? हा गंभीर प्रश्न बनला आहे

आशा कृषी सहाय्यक अधिकाऱ्यावर तालुका कृषी अधिकाऱ्यांचा दबदबाच नाही. हे यावरून दिसून येत आहे. तालुका कृषी अधिकारी यांची कमांड सुटली आहे, त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यातून मागणी होत आहे. तसेच
शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानीला तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक जबाबदार असणार आहेत.
कृषी अधिकाऱ्यांच्या अशा निष्काळजी वागण्यामुळे शेतकरी फळबाग लागवडीकडे कसा काय वळणार असा गंभीर प्रश्न बनू लागला आहे .
शेतकऱ्यांना कुशल ची पूर्ण बिले मिळणार का कृषी सहाय्यकावरती तालुका कृषी अधिकारी व तालुका मंडळ अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत







