कनवाळू मनाचे ‘गोपिशेठ’–शिवाजी हळणवर
काल सकाळी शेतकऱ्यांची व्यथा सांगणारी ABP माझाची क्लिप व्हायरल झाली,त्यात एक चिमुकला वडिलांकडे पैसे नसल्याने कपडे घेतले नाहीत असं बोलतोय... तो व्हिडीओ बहुजनांचे नेते आ. गोपीचंद पडळकर
यांनी पाहिला आणि त्यांचे मन हेलावून गेले.त्या बातमीत abp माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे दिसत असल्याने त्यांच्या कडे त्या शेतकरी पुत्रा विषयी माहिती घेत तो मुलगा कुठला आहे याची माहिती जाणून घेतली त्यावेळी तो लहान मुलगा संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव येथील ऋषीकेश ज्ञानेश्वर चव्हाण (वय ७ ,इयत्ता दुसरी) असल्याचे सांगताच या कनवाळू ह्दयाच्या माणसाने तात्काळ शेतकरी ज्ञानेश्वर चव्हाण व ऋषीकेश यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि धिर देत “मी तुमच्या सोबत असून माझे सहकारी तुमच्या घरी येतील ,दिवाळी साजरी करा” असा शब्द दिला.
लगेच साहेबांचे संभाजीनगर चे जिवलग सहकारी
Dilip Mote दिलिप मोटे साहेब यांच्याकडे तात्काळ त्या शेतकरी पुत्राची दिवाळी गोड करण्यासाठी ” दिवाळी साहित्यासह फटाके व रोख रक्कम पाठविली”
आ.पडळकरांच्या सुचनेनुसार दिलिप मोटे हे आज आपल्या सहकारी मित्रांसोबत ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बुट्टे वडगाव येथील घरी पोहचले व आ.गोपिचंद पडळकरांनी दिलेल्या शब्दानुसार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम सुपुर्द केली. आणि ऋषीकेश ची दिवाळी गोड केली….!
तर पत्रकार कृष्णा केंडे हे ग्राऊड लेवलला काम करीत असल्यामुळेच बातमी मागची बातमी दाखवत शेतकऱ्यांचे जिवन किती कष्टमय आहे. त्यांच्या वाट्याला असा भयानक संघर्ष आलेला असतो.हे जगाला दाखवून दिले. या बद्दल त्या पत्रकार बंधूचे शतशः आभार
आणि शेतकरी, पिडीत, वंचितविषयी मनापासून तळमळ असणाऱ्या आ.गोपिचंद पडळकरांना सलाम .!
शिवाजी हळणवर







