झरेत गॅस शेगडी विक्री केंद्राचा शुभारंभ
झरे ता.आटपाडी येथे स्वर्गीय अंबुताई मोहनराव भोसले गॅस शेगडी विक्री केंद्राचा शुभारंभ काँग्रेसचे युवा नेते जयदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वर्गीय लोकनेते मोहनकाका भोसले यांच्या विचारांचे हणमंत यादव यांनी लोकनेते मोहनकाका भोसले यांच्या पत्नी स्वर्गीय अंबुताई भोसले यांच्या नावाने गॅस शेगडी विक्री व दुरुस्ती केंद्र सुरू केले असून या केंद्राचे उद्घाटन युवा नेते जयदीप भोसले, प्राध्यापक साहेबराव चवरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवा नेते किरण पवार माजी सैनिक भालचंद्र मेटकरी, नारायण पाटील, दिलीप वाघमारे, अशोक सुतार, कान्तेश्वर दीक्षित, व ग्रामस्थ उपस्थित होते,







