दिघंचीत वारकऱ्यांच्या दिंडीत स्विप्ट डिझायर कार घुसल्याने तिघे वारकरी जखमी
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे हनुमान स्टील ट्रेडर्सच्या पश्चिमेस वारकऱ्यांना पाठीमागून स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तीन वारकरी जखमी झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांच्या दिंडीत कार गाडी घुसण्याचा प्रकार घडला आहे.
घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, मोहिते वडगाव ता. कडेगाव जि.सांगली येथील वारकरी पंढरपूरकडे पायी चालत निघाले होते.
आज सायंकाळच्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने तीन वारकरी यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
यामध्ये भिमराव पांडुरंग जाधव वय ७५ वर्षे, धनाजी राजाराम मोहिते वय ४० वर्षे,शिवाजी मारुती मोहिते वय ५० वर्षे, सर्वजण रा. मोहिते वडगाव ता. कडेगाव जि. सांगली अशी जखमींची नावे आहेत.
भानुदास दशरथ थोरात वय ५२ वर्षे रा, रहाटणी ता. खटाव जि. सांगली असे स्विफ्ट चालकाचे नाव असून.झरे-दिघंची रस्त्यावर दिघंची गावच्या हद्दीत हनुमान स्टील ट्रेडर्स दुकानापासून पश्चिमेस 100 मीटर अंतरावर रस्त्याच्या उत्तर बाजूस रस्त्यावर अपघात झाला.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.







