तीर्थक्षेत्र खरसुंडी देवस्थान् परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी अमरन उपोषण
सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी खरसुंडी येते सामाजिक कार्यकर्ते शेखर निचळ व त्यांचे कार्यकर्ते यांनी अमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे . भाविक ग्रामस्थानी वारंवर तक्रार करून सुद्धा कोणीही दखल घेतली नसल्याने अमरन उपोषण करीत असून मंदिर परिसरातीला आतिक्रम हटविल्यशिवाय अमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे शेखर निचलं यांनी संगीतलं आहे
सिद्धनाथाच्या विविध उत्सवानिमित्त दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत असते. देवदर्शनाला जात असताना भाविकांना अतिक्रमणामुळे अरुंद रस्ते झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे ग्रामपंचायत व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून भाविकातून वारंवार याविषयी तक्रार करूनही कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे
नाथनगरीत येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यावरच थाटले असल्याने देवदर्शनाला मंदिरात सिद्धनाथाचे दर्शनन घेण्यासाठी जात असताना भाविकांची मोठी गर्दी होऊन बालक वृद्ध व महिलांना नहाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे
त्यामुळे मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमण काढून मंदिर परिसर मोकळा करावा भाविकांना सुलभतेने दर्शन मिळावे अशी व्यवस्था करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे या आंदोलनास विविध मंडळा चे पदाधिकारी ग्रामस्थ युवा कार्यकर्ते यांनी पाठींबा दिला आहे







