कुरुंदवाडी येथील बिरुदेव देवस्थानच्या विकासासाठी 5 कोटी निधी व ब वर्गात समावेश करण्याची आम.गोपीचंद पडळकर यांची मागणी
कुरुंदवाडी तालुका आटपाडी येथील प्रसिद्ध बिरुदेव देवस्थानच्या विकासासाठी पाच कोटी रुपयाची आमदार गोपीचंद पडळकर यांची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आहे.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथील श्री बिरुदेव देवस्थान विकसित करण्यासाठी तिर्थक्षेत्र ‘ब’ वर्गात समावेश करून ५ कोटी रुपये निधी उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केली आहे व ही मागणी लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आ.पडळकर यांनी व्यक्त केली व्यक्त केली







