• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान,
लवकरच बैठक, माण नदी बारमाही होणार
आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांची आटपाडी येथे पत्रकार परिषदेत माहिती

माणगंगा by माणगंगा
November 10, 2022
in सांगली
0
राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान,लवकरच बैठक, माण नदी बारमाही होणारआमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांची आटपाडी येथे पत्रकार परिषदेत माहिती

राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान,
लवकरच बैठक, माण नदी बारमाही होणार
आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांची आटपाडी येथे पत्रकार परिषदेत माहिती

आटपाडी


राजेवाडी तलावामध्ये जीये कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख यांचे गतिमान प्रयत्न सुरू असून कोरेगाव व माण-खटावरच्या मागणीनंतर शिल्लक राहिलेले ०.७५ टीएमसी पाणी राजेवाडी तलावात सोडून दरवर्षी तलाव भरण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठक होणार असून यामुळे माणगंगा नदी बारमाही होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा नदीकाठच्या परिसरातील गावांना होणार आहे.

आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख यांनी ही माहिती दिली.


यावेळी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,जिल्हा परिषदेचे सदस्य अरुणभाऊ बालटे व मोहनराव रणदिवे, भाजपाचे युवा नेते जयवंतराव सरगर, युवा नेते अनिलशेठ पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष यल्लाप्पा पवार, माजी अध्यक्ष प्रणव गुरव, हरीशेठ गायकवाड, सोशल मीडियाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी, डॉ.खरजे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.


आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव हा अति दुष्काळी भागात असून तो दहा वर्षातून एकदा किंवा दोनदा पावसाच्या पाण्याने भरतो. हा तलाव शंभर वर्षापेक्षा जास्त जुना असून या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात व वरील बाजूस छोटी छोटी धरणे झाली असल्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचून तलाव भरत नाही. त्यामुळे त्याची शाश्वत क्षमता कमी झाली आहे. त्यामध्ये नैसर्गिक ऐवा कमी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी कायमच वंचित राहतात. हा तलाव जीये कटापूर किंवा उरमोडी यांच्या लाभ प्रभावक्षेत्रात येत आहे.

या योजनाचे सुमारे ०.७५ (पाऊण) टीएमसी पाणी जर या तलावात दिले असता दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव भरणार आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावामध्ये जीए कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत खासदार संजयकाका पाटील यांनीही संबंधितांना आदेश देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.


कोरेगावचे आमदार महेश शिंदे व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी या प्रकल्पाच्या पाण्याबाबत मागणी केली आहे. त्यांना आवश्यक असणारी पाण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहणारे ०.७५ टीएमसी पाणी राजेवाडी तलावात सोडून तलाव दरवर्षी भरल्यास लिंगीवरे, पुजारवाडी(दि), उंबरगाव व दिघंची गावच्या हद्दीतील उत्तरेकडील भागासह काही भागाला या पाण्याचा लाभ मिळणार आहे.


विशेष म्हणजे हे पाणी सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची किंवा पैशाची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे नवीन काम करण्याचे नाही. फक्त सद्यस्थितीत चालू असलेल्या मोटारी जास्त वेळ चालवून हे पाणी येऊ शकते. यासाठी फक्त या भागाचा योजनांमध्ये समावेश करणे महत्त्वाचे आहे. ०.७५ (पाऊण) टीएमसी पाणी जर कायमस्वरूपी दिले, तर माणगंगा नदी बारमाही होईल. पाणी योजनेतील जीये कटापूर बोगद्याचे काम महिनाभरात पूर्ण होत आहे. संपूर्ण अंतर 135 किलोमीटर असून या बोगद्यामुळे पाणी येणे सोयीचे होणार आहे, असेही आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख म्हणाले.


या व्यतिरिक्त राहिलेल्या क्षेत्राला टेंभूच्या योजनेतून लाभ मिळणार आहे.आटपाडी तालुक्यातील पश्चिमेकडील पिंपरी,गुळेवाडी आदि गावांसह व पूर्वेकडील बोंबेवाडी, पिंपरी खुर्द आदि भागांनाही टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ होणार आहे. यासाठी बंदिस्त पाईपलाईनचा मार्ग सुकर आहे.
एमआयडीसीबाबत बोलताना आमदार पडळकर म्हणाले, पाणी दाखल्यासाठी रखडलेले काम आता मार्गी लागले असून कामथ किंवा जांभुळणी तलावातून एम आय डी सी च्या पाण्याची समस्या सुटणार आहे.

शेतकऱ्यांनी जागा-जमीन देऊ केलेले असून ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्रही मार्गी आहे. कामथ येथील शासनाच्या विभागाच्या अखत्यारीतील दीडशे एकर क्षेत्राबाबत विचार होऊन एमआयडीसीसाठी 350 एकर शेतजमीन प्रश्न मार्गी लागत आहे. एमआयडीसीमुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तीन किंवा साडेपाच पट भरपाई मिळणार असून त्यांना एम आय डी सी मध्ये बिगर शेतीचे प्लॉटही मिळतात. त्यामुळे एमआयडीसीचा प्रश्न लवकरच मार्गस्थ होऊ लागला आहे.


आटपाडी तलावानजीक फुलपाखरांची बाग, वॉकिंग ट्रॅक, तलावात बोटिंग
आटपाडी येथे तलाव परिसरात फुलपाखरांची बाग करण्याचा नवीन प्रस्ताव सुचविण्यात आला असून तलावात बोटिंग सुविधा करण्याचा तसेच त्या परिसरात वॉकिंग ट्रॅक, बगीचा यासारख्या सुविधा उपलब्ध करून आपल्याच जवळच्या परिसरात लोकांना विरंगुळा, आनंद घेता येणार आहे यासाठी विशिष्ट पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत.

Views: 486
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आम. पडळकर यांच्या प्रयत्नातून दिघंचीतील श्री खंडोबा मंदिराचा ‘क ‘वर्गात समावेश – शेखर रणदिवे यांची माहिती

आम. पडळकर यांच्या प्रयत्नातून दिघंचीतील श्री खंडोबा मंदिराचा 'क 'वर्गात समावेश - शेखर रणदिवे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)