आम.पडळकर यांच्या प्रयत्नातून दिघंचीतील श्री खंडोबा मंदिराचा ‘क ‘वर्गात समावेश – शेखर रणदिवे यांची माहिती
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची ता.आटपाडी गावच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडली असून लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून श्री क्षेत्र खंडोबा मंदिर (माळी समाज) या मंदिराचा क वर्गामध्ये समावेश झाला आहे.
खंडोबा मंदिराचा क वर्गामध्ये समावेश झाल्याने मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी मिळून मंदिराचा व मंदिराच्या परिसराचा विकास होईल.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नातून क वर्गामध्ये समावेश केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती युवा नेते शेखर रणदिवे यांनी दिली







