लिंगीवरे येथे विधी सेवा समिती मार्फत कायदेविषयक शिबिर संपन्न
लिंगीवरे तालुका आटपाडी येथे तालुका विधी सेवा समिती मार्फत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये घरदार जमीन नावावर करून घेऊन मुले सांभाळत नसतील तर जमीन घर तर मिळतेच शिवाय पोटगी मिळू शकते .
सदर कार्यक्रमांमध्ये :- विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक समिती द्वारा काय काय कार्य केले जातात.• विधी सेवा प्राधिकरण समिती कोणत्या व्यक्तींना मोफत विधी पुरवते • कोणकोणत्या विषयासंबंधात कायदेशीर साह्य उपलब्ध करून घेता येणार नाही? कोण कोणत्या स्वरूपाची विधी सहाय्यता पुरवली जाते. विधी सहाय्य प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा. वगैरे विविध विषयावर सखोल चर्चा झाली.यावेळी दिवाणी न्यायाधीश विनायक पाटील यांनी मार्गदर्शन केले
छोटे-मोठे तंटे ग्रामस्थांनी सामोपचाराने गावातच सोडवावे तसेच दिनांक 12 /11 /2022 रोजी होणाऱ्या लोकादलात मध्ये केसेस मिटवुन घ्यावे याबाबत ही त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी आटपाडी वकील संघाचे विविध पी जी शिंदे यांनी सातबारा उतारा बाबत माहिती दिली त्याच्या नोंदी कशा पहाव्यात 7/12 उतारा म्हणजे नेमका काय याबाबत सविस्तर माहिती तसेच एस डी सातपुते यांनी महिला विषयक कायदे बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका वकील संघटना आटपाडी सचिव व्ही .बी. सावंत विस्तार अधिकारी संतोष कदम ग्रामसेवक खंडागळे गावचे सरपंच उपसरपंच इतर मान्यवर उपस्थित होते







