प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आयएएस आयपीएस अधिकारी व्हा – श्री अनंत टेंगसे सह दिवाणी न्यायाधीश आटपाडी यांचे आवाहन –
तालुका विधी सेवा समिती आटपाडी मार्फत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विष्णुपंत रामचंद्र लोणारी गुरुकुल स्कूल अँड कॉलेज आटपाडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमास माननीय श्री अनंत टेंगसे सह दिवानी न्यायाधीश आटपाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आयएएस ऑफिसर आयपीएस ऑफिसर होण्याचे आवाहन केले. तसेच वेगवेगळे कायदेविषयक मार्गदर्शन देऊन कायदा सांभाळून पुढे जाण्याचीही त्यांनी आवाहन केले.
यावेळेस आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, आटपाडी वकील संघटनेचे वकील व्ही एस दानी , एम.एम. पाटील गुरुकुलचे प्राचार्य श्री साळुंखे, सामाजिक कार्यकर्त्या कांबळे इत्यादी उपस्थित होते







