सतेज दणाणे लिखित ग्रंथाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याला भारत आणि भारताबाहेरील नागरिकांची उपस्थिती
झरे ता. आटपाडी येथील पद्मभूषण डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी कला महाविद्यालय , येथे
दि. 16 जुलै 2019 रोजी सायं.०४:०० वाजता प्रा. डॉ. सतेज दणाणे यांच्या ‘ डॉ. बाबुराव गायकवाड यांच्या वाड,मयाचा मागोवा ‘ व ‘भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने’ या ग्रंथाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा व परिसंवाद घेण्यात आला.
हा कार्यक्रम पद्मभूषण डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी कला महाविद्यालय , झरे, जि. सांगली व वारूळ त्रैमासिक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकचे डॉ. विवेक खरे उपस्थित होते. भटक्या जमातीचे साहित्य वेगळे न करता त्याचा दलित साहित्यात समावेश करावा असे त्यांनी प्रतिपादन केले .आणि लेखकाचीही अशीच भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रंथाचे प्रकाशन संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर चे डॉ. महादेव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दणाणे यांचे दोन्ही ग्रंथ हे वाचक समीक्षक व अभ्यासक यांना उपयुक्त ठरणारे आहेत असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. ‘मागोवा’ ग्रंथावर भाष्य करताना प्रा. डॉ.बळवंत मगदूम म्हणाले, डॉ.सतेज दणाणे यांचा ‘ मागोवा’ ‘ हा ग्रंथ बाबुराव गायकवाड यांच्या वागमयाचा एकत्रित परिचय करून देणारा असून आस्वादक समीक्षेचा ग्रंथ आहे. डॉ. सर्जेराव पद्माकर यांनी ‘ ‘ ‘ ‘ भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने ‘ या ग्रंथावर बोलताना सतेज दणाणे यांनी केलेली ग्रंथाची मांडणी आणि त्यामधील मते ही ठामपणे नोंदवण्याचे सांगितले. डॉ. प्रमोद गारोडे यांनी आपल्या मनोगतातून सतेज दणाणे यांच्या लेखनास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बाबुराव गायकवाड, सुमन गायकवाड,धारवाड (कर्नाटक) , तृप्ती पाटील
यशवंत पाटील, बेळगाव , डॉ. संगीता सोमवंशी ग्वाल्हेर मध्य प्रदेश ,डॉ. वासुदेव सावंत गोवा, गुलबर्गामधून भालचंद्र शिंदे, लंडन मधून नंदिनी गायकवाड, औरंगाबाद मधून डॉ.कैलास अंभुरे, डॉ.त्रिभुवन, अमरावती मधून प्रमोद गारोडे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, रत्नागिरीमधून संजय पाटोळे,अनिता अंबोकर , वर्षा कुबल, विनोद भुवड, दिगांबर चौगले, मुंबई मधून डॉ. किरणकुमार कवठेकर, राज्य पुरस्कार प्राप्त लेखक दिनकर कुटे, डॉ. रामदास नाईकनवरे, जयंत कार्तिक,प्रकाश मुंज मंजुळ प्रकाशन चे सुनील अंबिके व मेघा अंबिके हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रामेश्वर कांबळे यांनी प्रास्ताविक राजाराम पाटील यांनी केले.तंत्र सहाय्य डॉ. युवराज मोटे यांनी दिले, तर कार्यक्रमाचे आभार वारूळ मासिकाच्या संपादक डॉ. कमल दणाणे यांनी मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य प्रा.राजाराम पाटील यांनी केले. त्यांनी कार्यक्रम आयोजन करण्यामागील भूमिका विशद केली.
याप्रसंगी या दोन ग्रंथाचे लेखक सतेज दणाणे यांनी आपल्या ग्रंथ लेखनामागील भूमिका मांडली. बाबुराव गायकवाड यांचे वागमयीन कार्य आणि त्यांची जडणघडण यांचा शोध घेण्या च्या हेतूने त्यानी डॉ. गायकवाड यांच्या तीस-बत्तीस कलाकृतीच्या अनुषंगाने बाबुराव गायकवाड यांच्या वाड,मयाचा मागोवा लिहिल्याचे सांगितले, तर भटक्या जमातीच्या स्त्रियांची आत्मकथने या ग्रंथामध्ये गोपाळ आणि गोंधळी, जोशी या भटक्या जमातीतील स्त्रियांचे शिक्षण, भटकंती, श्रद्धा ,अंधश्रद्धा ,रूढी परंपरेतून झालेली वाटचाल आणि चळवळीच्या निमित्ताने त्यांच्या समाजाची बंधने आणि त्यातून केलेला संघर्ष याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अंगाने शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी विशद केले.







