आटपाडीच्या युवकाची शेटफळेत मामाच्या घरी पेटवून घेत आत्महत्या : आत्महत्याचे कारण अस्पष्ट
आटपाडी
शेटफळे ता.आटपाडी येथे मामाकडे रहायला आलेल्या विकास दादासो चव्हाण वय 35 रा.रानमळा आटपाडी या भाच्याने शुक्रवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास मामाच्या राहत्या घरी पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेने शेटफळे व आटपाडी मध्ये शोककळा पसरली आहे.
आत्महत्यचे नेमके कारण अध्याप अस्पष्ट आहे.घटनेची फिर्याद ग्रामीण रुग्णालयाच्या वैधकीय अधिकारी डॉ.आसमा पटवेगार यांनी आटपाडी पोलिसांना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी रानमळा येथे राहणारा विकास चव्हाण हा युवक आपल्या मामाच्या शेटफळे या गावी दीपावली निमित्त आला होता. त्याचे आटपाडी तालुक्यातीलच मुलीशी चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते.मात्र पती पत्नी यांच्यामध्ये काही कारणास्तव तणाव निर्माण होत त्यांच्यामध्ये कोर्ट केस सुरू होती. आज त्याचीच तारीख असल्याने तो कोर्टात जाणार होता.मात्र गेल्या काही दिवसांपासून तो वेगळ्याच विचारात रमत मी मरणार असल्याचे सांगत होता.
दरम्यान शुक्रवारी सकाळी मामाच्या राहत्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये कोणी नसल्याचे पाहुन त्याने पेटवुन घेतले.दरम्यान त्याचे मामा रावसाहेब संदीपान गायकवाड यांनी त्याला तात्काळ आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.







