• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

टेंभू उपसा सिंचन योजना घाणंद वितरिकेचे काम निष्कृष्ट दर्जाचे – विठ्ठल पडळकर
पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असून सुद्धा बंद पाईपलाईन मधून पाणी पुढे सरकेना

माणगंगा by माणगंगा
November 16, 2022
in सांगली
0
टेंभू उपसा सिंचन योजना घाणंद वितरिकेचे काम निष्कृष्ट दर्जाचे – विठ्ठल पडळकरपश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असून सुद्धा बंद पाईपलाईन मधून पाणी पुढे सरकेना

टेंभू उपसा सिंचन योजना घाणंद वितरिकेचे काम निष्कृष्ट दर्जाचे – विठ्ठल पडळकर
पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असून सुद्धा बंद पाईपलाईन मधून पाणी पुढे सरकेना


आटपाडी प्रतिनिधी


टेंभू उपसा सिंचन योजनेची घानंद वितरीका चे काम सुरू आहे. तर काही काम पूर्णत्वाकडे गेले आहे, हे बंदिस्त पाईपलाईन पूर्णपणे चुकीची टाकलेले आहे. या निष्कृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पडळकर यांनी केले आहे.


कारण या बंद पाईपलाईन मधून पाणी पुढे सरकत नाही. घानंद वितरिकेमधून कामाथ, मुढेवाडी, मापटेमळा, आटपाडी या भागांमध्ये पाणी जात आहे. परंतु बंद पाईपलाईन टाकल्यापासून या भागामध्ये पाणी गेलेच नाही.


आटपाडी तालुक्याचा विचार केला असता घाणंद, कामथ ही गावे आटपाडीच्या पश्चिमेला उंचावर आहेत, आटपाडी पूर्वेकडे आहे जमिनीचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. पावसाचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते जर पावसाचे पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते तर बंदपाईप लाईन मधून पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे का जात नाही ? हा गंभीर प्रश्न आहे.


याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पडळकर यांनी अनेक वेळा टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या ही गोष्ट निदर्शनाला आणून दिली. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, घानंद उपसा सिंचन योजनेतून पाणी पूर्वेकडे म्हणजेच मापटेमळा आटपाडी कडे गेलेच नाही. त्यामुळे ही पाईपलाईन पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने टाकलेली आहे.


जर पश्चिमे कडून पूर्वेकडे जमिनीला उतार असेल तर पाईपलाईन मधून पाणी गेलेच पाहिजे पाईपलाईन सुद्धा पूर्व पश्चिम आहे. पश्चिमेकडून टेंभूचे पाणी पाईपलाईन मधून पूर्वेला जात असते परंतु अद्याप पाणी पूर्वेला म्हणजेच पूर्वेकडील गावांना पाणी गेलेले नाही.


शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळावे म्हणून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, माझी आमदार स्वर्गीय गणपत आबा देशमुख यांनी अनेक दिवसांपासून लढा दिला. कारण त्यांना शेतकऱ्याच्या जमिनीत पाणी पोहोचलेलं बघायचं होतं. परंतु अद्यापही योजना अपुरीच राहिली आहे.
सन 1995 ला आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे अपक्ष म्हणून निवडून आले, निवडून आल्यानंतर त्यांनी युतीच्या सरकारला टेंभूचे पाणी मिळण्याच्या अटीवर पाठिंबा दिला होता. परंतु त्यांचेही स्वप्न अद्याप पूर्ण झाले नाही.


तालुक्यातील अनेक नेत्यांनी आटपाडीला पाणी मिळावे म्हणून संघर्ष केला. पाणी परिषदा घेतल्या, टेंभू योजनेचे काम सुरू झाले, परंतु काही चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन टाकल्याने व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अद्याप ज्या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले आहे त्या ठिकाणी ते यशस्वी झाले नाही.


तरी अशा संबंधित बंद पाईपलांची चौकशी व्हावी व चुकीच्या पद्धतीने बंद पाईपलाईन केली आहे अशा संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी, व बंद पाईपलाईन मधून शेकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळावे.

अन्यथा ज्या अधिकाऱ्यांनी बंद पाईपलाईन चुकीच्या पद्धतीने टाकली आहे त्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पडळकर यांनी दिला आहे .

Views: 359
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शिरपूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न

शिरपूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)