श्री सिद्धनाथ जन्माष्टमी निमित्त श्री नाथ मंदिर हॉल मध्ये युवा चित्रकार प्रतिक अभंगराव यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.प्रदर्शनाचे उद्घाटन श्री नाथ देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन चंद्रकांत पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असलेल्या श्री नाथांच्या उत्सव मूर्तीचे एक्रेलिक रंगातील चित्र चित्रकार अभंगराव यांनी साकारले होते.श्री नाथांच्या जन्माष्टमी निमित्त त्यांनी हे चित्र तयार केले आहे. चित्रामध्ये श्रींचे मूर्तीचे हास्य ,प्रसन्न भाव आपणास पाहायला मिळतात.
चित्रकार अभंगराव यांनी नवरात्र उत्सवात तयार केलेली नवदूर्गांची चित्रे व केदारनाथ मंदिराची प्रतिकृती प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरली. तसेच प्रदर्शनात अमूर्त शैली, व्यक्तिचित्रे, ग्रामीण सांस्कृतिक चित्रांचा समावेश होता.
प्रदर्शनास मित्रपरिवार भाविक,ग्रामस्थ व कलाप्रेमी यांनी उपस्थिती लावली.







