मापटेमळा ता. आटपाडी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
मापटेमळा ता.आटपाडी येथील दिपक चंद्रकांत पिसे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आत्महत्या चे कारण स्पस्ट झाले नाही
पोलिसांच्या कडूननुसार मापटेमळा ता. आटपाडी जि. सांगली येथील दिपक चंद्रकांत पिसे (वय २१) याने राहत्या घरामध्ये दुपारच्या वेळेस घरात कोणीही नसताना साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याचे नातेवाईक सिद्धेश्वर चंद्रकांत पिसे यांनी मयत अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबतची वर्दी ग्रामीण रुग्णालयातील डॉ.अस्मा पट्टवेगार यांनी फोनवरून पोलीस ठाण्यामध्ये दिली.
प्राथमिक तपास व पुढील चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस नाईक माने, पोलीस शिपाई पांढरे करीत आहेत.







