त-हाडी सह परिसरातील वादळ व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
तऱ्हाडी:- हवामान विभागाने जाहीर केल्यांनतर शुक्रवारी दुपारी तीन वाजता शिरपूर तालुक्यातील त-हाडीसर परीसरात वादळी वाऱ्यासह एक तास जोरदार पाऊस झाला, त्यानंतर अर्धा तासानंतर गारपिट झाली तऱ्हाडी सह नऊ गावातील आबा, पपई. भुईमूग. कांदा, टरबुज फळबागाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील त-हाडी व वरूळ झालेल्या गारपीटीमुळे त-हाडी वरुळ भटाणे अभानपुर परिसरातील चार गावात ज्वारीसह उन्हाळी बाजरी व मका शेतात वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली .शिरपूर शहादा रोडवर हिंगणी येथे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने शिरपूर व शहादा कडे जाणारी वाहतूक दोन तास वाहतुक बंद होती.त-हाडी शुक्रवारी दुपारी तीन वाजता वादळाचा तडाखा बसला वाऱ्यासह पाऊस झाला.
त्यानंतर साडेतीन ते चारच्या
दरम्यान तालुक्यातील त-हाडी वरुळ भटाणे अभानपुर विखरण जवखेडा भामपुर. ममाणे .जळोद फत्तेपूर. अशा नऊ गावांतील शिवारात गारपीट होऊन आंबा, कांदा भुईमूग ज्वारी बाजरी डाळिंब, टरबुज या फळ पिकांचे नुकसान झाले. यात गारांच्या माऱ्यायामुळे केळी जमीनदोस्त झाल्या आहेत, मिरची, टॉमटो, कांदा या उन्हाळी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शेतात कावाणी केलेली ज्वारी, गहु हरभरा या पिकाच्या राशी भिजल्या
त-हाडी गावातील शेडवरील पत्रे लग्न मंडप उडून गेले होते.
गारांच्या मुळे पक्षांचाही मृत्यू झाला आहे.त-हाडी वरूळ येथे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
फोटो:-तऱ्हाडी येथे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा मका बाजरी पिकाचे नुकसान