बोपदेव घाटात तीव्र वळणावर खडी पसरल्याने अपघाताचा धोका सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी
पुणे (प्रतिनिधी ) अॅड . दत्ताञय फडतरे
पुणे – सासवड मार्गावरिल बोपदेव घाटातील अपघाती वळणावर खडी पसरल्यामुळे वाहनचालकांना ञास सहन करावा लागत आहे .इंग्रजी डब्ल्यु आकाराच्या असणार्या घाटरस्त्यात बुधवारी सकाळी दुचाकी घसरल्यामुळे वाहनचालकांना किरकोळ दुखापत झाली आहे . सासवड शहराला जोडणार्या या भागातुन जेजुरी , वीर , कोडीत , कानिफनाथ गड , नारायणपुर , पुरंदर किल्ला या भागात फिरण्यासाठी पर्यटक तसेच देवदर्शनासाठी भाविक येत असतात .
नोकरी , धंदा , शिक्षण तसेच व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणार्या वाहनचालकांची संख्या अधिक असते . दुधगाड्या , मालवाहतुकीच्या गाड्या येत असतात .शहरातील स्वारगेट तसेच काञज पी.एम.पी आगारातुन पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने बससेवा उपलब्ध आहेत . अरुंद भागातील तीव्र वळणावर खडी पसरल्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षित प्रवासासाठी अडथळा अडथळा निर्माण झाला आहे .
अपघाती भागात अरुंद जागा असल्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे . घाटरस्त्यावर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . सार्वजनिक बांधकाम तीव्र वळणावरिल भाग सुस्थितीत करण्याची मागणी दैनंदिन वाहनचालकांमधुन होत आहे .







