शिक्षक आमदार, जयंत आसगावकर यांच्यापुढे 21 वर्ष पगारापासून वंचित प्राध्यापकांची कैफियत. ..!
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार, मा. जयंत आसगावकर यांची भेट घेऊन त्यांचे समोर, पाठीमागील 21 वर्षापासून बिनपगारी सेवा करत असलेल्या कला व विज्ञान महाविद्यालय, आटपाडी, जिल्हा सांगली येथील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली कैफियत मांडली . अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 21 वर्ष विनावेतन सेवा करून पुढील चार ते पाच वर्षात सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानी अनेक वेळा सरकार पुढे यासंदर्भात मागणी व आंदोलने करूनही सरकारला याची दया येत नाही. सरकारने किमान त्यांच्या लेकरा-बाळांना व कुटुंबियांना तरी न्याय द्यावा, यासाठी तुम्ही प्रयत्न कसोशीने प्रयत्न करावेत. अशी कळकळीची विनंती सर्व शिक्षकांनी केली आहे.
यावेळी मा. आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले की, “मी या संदर्भातील लक्षवेधी प्रश्न नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पाठवलेला आहे. तसेच मी अनेक दिवसापासून या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे. यापुढे ही मी 24 नोव्हेंबर, 2001 पूर्वीच्या महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्यासाठी सरकार पुढे मागणी करणार आहे.
आटपाडी येथील श्रीराम बहुद्देदेशीय सेवाभावी संस्था संचलित, कला व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा.जयंत आसगावकर यांच्या श्रीराम ज्युनिअर कॉलेज, कुडित्रे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली.







