मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी: दिपक नामदे
कलेढोण वार्ता: मायणी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक प्रभात चे बातमीदार दिपक नामदे यांची तर उपाध्यक्ष पदी इम्रान जमादार यांची निवड झाली.


मायणी परिसर पत्रकार संघाची वार्षिक बैठक मायणीत पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग तारळेकर अध्यक्ष दिलीप पुस्तके यांच्या अध्यक्षतेखाली खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीत सन- 2023 वर्षासाठी नूतन कार्यकारीनी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली. त्यामधे श्री.नामदे यांची अध्यक्षपदी , कार्याध्यक्ष पदी विशाल चव्हाण, उपाध्यक्ष पदी इम्रान जमादार , सचिव पदी मंगेश भिसे, खजिनदार पदी नदीम शिकलगार, एकनाथ जाधव कायदेशीर सल्लगार, सदस्यपदी सतीश डोंगरे व अमोल भिसे चंदन वरुडे यांची निवड करण्यात आली.
तरी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे व सदस्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.







