• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!प्रकरणाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण.

माणगंगा by माणगंगा
August 29, 2023
in सातारा जिल्हा
0
दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!प्रकरणाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण.

दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!
प्रकरणाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण.

दहिवडी ता.माण येथील नगरपंचायतीचे राष्ट्रवादी पुरस्कृत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर पोळ व मुख्याधिकारी कपिल जगताप आर्थिक फायद्यासाठी भोंगळ कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांना घरचा आहेर दिला आहे. यामुळे दहिवडी नगरपंचायतीतील धुसपुस चव्हाट्यावर आली आहे.


माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी शहराच्या नगरपंचायतीमध्ये नक्की चाललय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
दहिवडी नगरपंचायतने पंधरावा वित्त आयोग अनुदान अंतर्गत मोरे मळा येथील पाणीपुरवठा विहीर ते पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन करण्याचे काम प्रस्तावित केले होते.त्या संदर्भात २१/०६/२०२३ रोजी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर सदर कामाबाबत शंका असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे लक्षात येताच श्री साळुंखे यांनी दि.२४/०७/२०२३ रोजी मुख्याधिकारी दहिवडी यांना पाईपलाईन बिला संदर्भात पत्र दिले होते.

त्यानंतर दि.१४/०८/२०२३ रोजी मुख्याधिकारी दहिवडी यांना दि.२४/०७/२०२३ च्या संदर्भात स्मरणपत्र दिले.यात असे म्हटले की दि.२४/०७/२०२३ रोजी पाईपलाईनचे बिल न काढण्याबाबत पत्रव्यवहार केला होता तसेच दि.३१/०७/२०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले नसल्याचा उल्लेख करून माझ्या परस्पर बिल अदा केल्यास माझ्यासह सहकारी नगरसेवक उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.


यावर बोलताना श्री साळुंखे म्हणाले की दहिवडी मोरे मळा विहीर ते पाणीपुरवठा टाकीपर्यंतच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे असून गटाराच्या पाण्यातून व दहिवडी कॉलेजच्या मुतारी जवळून पाईपलाईन आल्याने पाईपलाईन फुटल्यास दहिवडीला गटाराचे पाणी व अशुद्ध पाणीपुरवठा होऊन मानवी आरोग्य धोका निर्माण होऊ शकतो तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी प्रसारमाध्यमांनी विचारले असता ४९ लाख रुपयांचे असणाऱ्या पाईपलाईनच्या कामाचे चार फूट खोलीकरण करणे बंधनकारक असताना प्रत्यक्ष दोन फुटापर्यंत केले आहे.


माझी हरकत असतानाही सदर बिल अदा केल्याने व कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याने मी नगरसेवक सहकाऱ्यांसह उपोषणास बसणार आहे.दरम्यान मी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या पत्राचे उत्तर दिनांक ११/०८/२०२३ रोजी दहिवडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना प्राप्त होऊन व त्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या स्तरावरून कार्यवाही करावी व केलेली कार्यवाही संबंधितांना परस्पर कळवावी अशा सूचना करूनही दिनांक २९/०८/२०२३ पर्यंत सदर पत्रावर कोणतीही दखल न घेता मला परस्पर कळवले नाही त्यामुळे मला विश्वासात न घेता केलेल्या कामाची चौकशी करावी,अन्यथा सहकारी नगरसेवकांसह उपोषणास बसणार आहे असा घरचा आहेर त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

Views: 165
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे…राखी with खाकी

चाळीसगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे...राखी with खाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)