अचानक एकजूट मिञ मंडळाचा
गणेशोत्सव उत्साहात संपन्न
पुरंदर
अॅड .दत्ताञय फडतरे
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील श्री क्षेञ कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी असणार्या अचानक एकजूट मिञ मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. मंडळाचे हे सत्ताविसावे वर्षे होते.
परंपरेप्रमाणे मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या मुर्तींची ढोल -ताशांच्या गजरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.
दररोज सकाळी नव वाजता आरती तर राञी आठ वाजता बाप्पाची आरती घेतली जात होती . आरतीनंतर दररोज महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते . दानशुर अन्नदात्यांचा सत्कार व संकल्प सोडण्याचा कार्यक्रम पार पाडला गेला. अनेक नागरिकांनी पावतीच्या माध्यमातुन देणगी दिली .
गणशोत्सवाच्या दहा दिवस दररोज राञी परिसरातील नागरिकांकडून स्वयंस्फुर्तीने महाप्रसादाचे नियोजन करत होते . महाप्रसादानंतर दांडीयाचा कार्यक्रमात महिला , मुल- मुली मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होत होते. अधुनमधुन काहीसा पाउस येत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले
मंडळाचे युवा कार्यकर्ते मोठ्या हिरहिरीने सहभागी झाले . या परिसरात बाहेर ठिकाणांहुन स्थायिक झालेले नागरिकही भक्तीभावाने उत्साहात सहभागी झाले . सकाळी , संध्याकाळी गणरायांच्या गाण्यांमुळे परिसरात उत्साह संचारला होता .
कानिफनाथ मळा परिसरातील
अंगणवाडी , प्राथमिक शाळा , माध्यमिक विद्यालय सुटताच विद्यार्थी , लहान मुल – मुली मंदिराकडे धाव घेत होते .
सोमवारी मंडळाच्या वतीने महापुजेचे नियोजन करण्यात आले . सकाळ पासुनच मंडळाचे कार्यकर्त्यांनी मंदीर हार , फुलांची सजवले होते . मंदिरासमोर रांगोळी काढण्यात आली होती . परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला. भजनाची व्यवस्था करण्यात आल होती . राञी दहा ते बारा पर्यंत सुश्राव्य अशा भजनाचा कार्यक्रम पार पडला.
अनंत चतुर्देशीच्या दिवशी राञी आठ वाजता बाप्पा मिरवणूकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली .
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या . , एक लाडु चंद्रावर , गणपती बाप्पा उंदरावर , उंदीर मामा की जय , अशा भक्तीभावाने घोषणा सुरु होत्या.
विसर्जनासाठी हार , फुलांनी ट्रॅक्टर सजविण्यात आला होता . छोटे डीजे साउंड सिस्टीम , नवीन रिमीक्स गाण्यांच्या तसेच पारंपारिक गणेश गीतांच्या तालावर मंडळाचे कार्यकर्त्यांनी वाजत गाजत व नाचत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले . ठराविक वेळानंतर फटाक्यांचे बार , आतषबाजी करण्यात आली .
पाच तासांच्या भव्य मिरवणूकीनंतर पहाटे तीन वाजता वाजत गाजत बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले .