अपंग दिनानिमित्त बचेरी सरपंच सौ राणी गोरड यांनी अपंगाला कारकून पदी निवड करून केला सन्मान…..
विश्वजीत गोरड/ पिलीव प्रतिनिधी –
बचेरी ग्रामपंचायत येथे कारकुण पदाची जागा रिक्त होती ती जागा भरत असताना सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांनी कायदेशीर बाबीची पूर्तता करून पेपरला जाहिरात देऊन अर्ज मागवले होते.
त्यानुसार सरपंच व सदस्यांनी सदर अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून गुणवत्तेच्या आधारावर शिवराम उत्तम ढवळे या अपंग व्यक्तीची निवड केली.आज अपंग दिन असून अपंग दिना दिवशी एका अपंगाची कारकून पदावर निवड हा दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल.
या निवडीनंतर सर्व अर्जदारांचे गुणांकन ग्रामपंचायत वार्ता फलकावर प्रसिद्ध करण्यात आले. शिवराम उत्तम ढवळे यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य यांचे कौतुक होत आहे.
एका गरीब कुटुंबातील अपंग व्यक्तीला रोजगार देऊन त्याचा सन्मान केल्याबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांनी सरपंच सौ राणी विश्वजीत गोरड यांचे आभार मानले.







