• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दहिवडी आगार असून अडचण;नसून खोळंबा ! दगडापेक्षा वीट बरीःएस.टी.नसल्याने प्रवासी नाराज

माणगंगा by माणगंगा
December 28, 2023
in सातारा जिल्हा
0
दहिवडी आगार असून अडचण;नसून खोळंबा ! दगडापेक्षा वीट बरीःएस.टी.नसल्याने प्रवासी नाराज

दहिवडी आगार असून अडचण;नसून खोळंबा!

दगडापेक्षा वीट बरीःएस.टी.नसल्याने प्रवासी नाराज

दहिवडी/धिरेनकुमार भोसले

माण तालुक्याचे मुख्यालय असलेल्या व मतदारसंघाची राज‌धानी असलेला दहिवडी एस.टी.आगाराबद्दल प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.प्रवाशांना तीन-तीन तास एस.टी.ची वाट पहावी लागत असेल तर दगडापेक्षा वीट बरी असे म्हणून प्रवासी खाजगी वाहन वडापचा वापर करताना दिसून आले.

दहिवडी बस स्थानकातून दुपारी १२ः०० वाजल्यापासून जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या सातारला जाण्यासाठी २:१५ पर्यंत एकही एस.टी.बस उपलब्ध नसल्याने दहिवडीच्या आगाराचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे.सकाळी ११ः३० वाजता बस स्थानकावर आलेले रुग्ण,अबाल वृद्ध,महिला,विद्यार्थी, विद्यार्थिनी तीन तास बस स्थानकावर बसून होते.प्रवाशांनी संपर्क साधल्यानंतर कशीबशी १:३० वाजता बस आली,परंतू त्यानंतर चालक उतरले आणि २:१५ वाजता बस सुरु केली.नंतरचा प्रकार असा की,बस तीन तासानंतर आल्याने आगारप्रमुखांनी किमान दोन बस तरी पाठवणे आवश्यक होते.परंतू तसे न करता एकच बस पाठवली.त्यामुळे एकुण ४५ ची आसन क्षमता असलेल्या बसमध्ये १४५ प्रवासी प्रवास करताना दिसून आले.

जादा प्रवासी असल्याने तिकीटे काढण्याच्या कारणास्तव वाहकाच्या विनंतीप्रमाणे चालकाने बस धीम्या गतीने चालवली नंतर आगाराने दोन बसेस पाठवल्या.परंतू चालक वाहकाने पाठीमागच्या बसमध्ये बसण्याचा आग्रह प्रवाशांना करून पिंगळी,महिमानगड,निढळ मध्ये प्रवासी घेतले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलून दाखवली.मग १४५ जण असून किती प्रवा‌सी एस.टी.प्रशासन बसवणार? असा सवाल प्रवाशांनी विचारला आहे.

प्रवाशांनी आगारप्रमुखांना संपर्क साधला असता,ते दत्त जयंतीची वर्गणी गोळा गोळा करताना दिसून आले.त्यामुळे तुम्हाला नक्की प्रशासनाने आगाराच्या सेवेसाठी नेमले आहे की वर्गणीसाठी? अशा तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.सातारसारख्या जिल्ह‌याच्या ठिकाणी रुग्णालय,शासकीय कार्यालये,महाविद्यालये असल्याने हजारो प्रवासी दररोज सातारला ये-जा करत असतात.जर या कार्यालय किंवा रुग्णालयात जाण्यासाठी प्रवासी ११ः३० बसस्थानकावर आला आणि जर तो ५:०० वाजता सातारला पोहोचत असेल तर दुसरी कोणती शोकांतिका असू शकते.दहिवडीतून सातारला बसेसनी जाण्यासाठी दोन तास कालावधी जातो.परंतू आता कोरेगाव शहरातील रस्त्याच्या कामामुळे जवळपास तीन तास लागतो.त्यामुळे २.१५ वाजता एस.टी.ने गेलेले प्रवासी ५:०० वा.पोहोचले आणि त्याच बसने मागारी परतले.यामुळे परिवहनचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे.हा सर्व घटनाक्रम पाहता आगारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हा व राज्यस्तरावरून काय कारवाई होणार? याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकटः
आगाराला कार्यक्षम आगारप्रमुख देता का?

मावळते आगारप्रमुख विक्रम हांडे यांच्या विरुध्द कर्मचारी व प्रवाशांच्या तक्रारीमुळे व कर्मचाऱ्यांच्या व संघटनांच्या आग्रहास्तव लोकप्रतिनिधींनी नवनियुक्त आगारप्रमुख कुलदिप डुबल यांची दहिवडी आगारात तडकाफडकी बदली केली खरी,पण एवढा सर्व आटापिटा करुनही जर आगार प्रशासन जैसे थे असल्याने व आगारप्रमुख आगाराचा नफा वाढवण्यात व नफा असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढवण्यात धन्यता मानत असतील तर सर्वसामान्य प्रवाशांनी दाद मागायची तरी कोणाकडे? यासह अनेक प्रतिक्रिया प्रवाशांनी बोलून दाखवल्या आहेत.

Views: 212
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्आयटी’मार्फत चौकशी करा ! - महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)