2024 च्या निवडणुकीत अनिलभाऊ दिलेला शब्द पाळतील : ब्रह्मानंद पडळकर
आमदार बाबर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असा शब्द दिला आहे. त्यामुळे आमदार अनिल बाबर जर शब्दाला जगणारे असतील, तर ते येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा देतील, असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केला.
ब्रम्हानंद पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर सर्कलमधील दहा गावात जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त विट्यात भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या कार्यालयात ब्रम्हानंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसुचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, राहुल मंडले, निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ब्रम्हानंद पडळकर म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही राजकीय विरोधक असतानाही केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर विद्यमान आमदार अनिल बाबर यांना पाठिंबा दिला. त्यावेळी बारामतीच्या विश्रामगृहावर आमदार बाबर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असा शब्द दिला होता.
आमदार बाबर हे शब्दाला जागणारे नेते आहेत. त्यामुळे यावेळी ते आम्हाला पाठिंबा देतील. त्यामुळे आम्हीच तुम्हाला निवडून आणले. मात्र, निवडणुकीनंतर पुढच्या सहा महिन्यांत त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यामुळे या मतदारसंघात जरी आमदार बाबर हे मित्र पक्षाचे असले, तरी आम्ही आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितल







