आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण सरगर
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी लक्ष्मण सरगर यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या झालेल्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. या निवडीमुळे सरगर यांच्याकडून पत्रकारांच्या अनेक अपेक्षा वाढल्या आहेत.
सरगर हे दैनिक लोकमतला तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.







