अंत्योदयच्या १४ हजार ३०९ कुटुंबांना मिळणार मोफत साडी…… !
राज्य यंत्रमाग महामंडळाकडून साड्यांचा होणार पुरवठा….
महेंद्र खोंडे
त-हाडी -प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिरपूर तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारक १४ हजार ३०९ कुटुंबांना येत्या शिवजयंती पर्यंत प्रतिकुटुंब एक साडी मोफत मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून शासकीय गोदामांमध्ये साड्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
गेल्या १० नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना सुरू करण्याचे निर्देशित करण्यात आले होते.
त्यानुसार या योजनेंतर्गत प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) ते येत्या शिवजयंती (१९ फेबूरवारी ) कालावधीत मोफत साड्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारक १४ हजार ३०९ कुटुंब असून, या प्रत्येक कुटुंबाला येत्या शिवजयंती पर्यंत एक साडी मोफत वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडून शासकीय गोदामांमध्ये साड्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
लवकरच होणार वितरण……
रेशन दुकानांत साड्या उपलब्ध झाल्यानंतर अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना प्रतिकुटुंब एका साडीचे मोफत वितरण रेशन दुकानांमधून सुरू करण्यात येणार आहे.
-भटेसिंग बोरसे (नायब तहसीलदार पुरवठा शिरपुर )
शासन निर्णयानुसार अंत्योदय रेशन कार्डधारक प्रत्येक कार्ड धारकांला एक साडी मोफत वितरित करण्यात येणार आहे. शिवजयंती पर्यंत लवकरच अंत्योदय कार्डधारकांना एक साडी मोफत रेशन दुकानात मिळणार आहे.
तालुक्यातील आकडेवारी…..
शिरपूर तालुक्यात २०६ स्वस्त धान्य दुका आहेत. तर ६३ हजार १०७ शिधापत्रिकाधारक आहेत.
-तालुक्यात अंत्योदय योजनेचे १४ हजार ३०९ शिधापत्रिका असून ३० लाख ८ हजार ०४८ नागरिकांना मोफत धान्य दिलंय जाते.
-अन्न सुरक्षा योजनेत ४८ हजार ७९८ शिधापत्रिकाधारक असून याचा लाभ २३ लाख ८ हजार ६५२ नागरिकांना मिळतो.