नवभारत साक्षरता जनजागृती कार्यक्रम आठवडे बाजार पळासनेर येथे उत्साहात संपन्न
शिरपूर
धुळे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ मंजुषा क्षीरसागर,जिल्हा नियोजन शिक्षणाधिकारी पुष्पलता पाटील व शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र सोनवणे यांच्या आवाहनानुसार नवभारत साक्षरता जनजागृती कार्यक्रम आठवडे बाजार पळासनेर ता. शिरपूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
पळासनेर केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी नवभारत साक्षरता अभियानाच्या प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने विविध भितीचित्र ,चित्रफिती स्टॉलमध्ये लावून बाजारात येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते नवभारत साक्षरता अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी केंद्र सरकार विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते त्या अनुषंगाने दिनांक 20 जुलै 2024रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन पळासनेर गावाचे उपसरपंच राजेंद्र माणिक भिल व डॉ. नीता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र प्रमुख नंदकिशोर पाटील मनोहर शिंदे यांनी नवभारत साक्षरता अभियानाचे उद्दिष्ट व ध्येय नागरिकांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे उल्हास ॲप याद्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
कार्यक्रमाला केंद्र मुख्याध्यापिका.छाया माळी, दुर्गेश वाडीले ,मुख्याध्यापक देविदास निळे तसेच केंद्रातील सर्व 22 शाळांचे मुख्याध्यापक किरण कोळी, ईश्वर पावरा, शिवन्या वळवी दिलीप गवळे, दिनेश मोरे, रतिलाल पावरा,कृष्णा पावरा, निर्वास पावरा, विजय कोकणी, हमील पवार, योगेश्वर मोहिते, सुरेश पावरा,पंडित अहिरे, नबीलाल ठाकरे, अशोक वसावे, लता पावरा, कैलास कोळी नितीन पाटील कृष्णा पाटील पळासनेर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मनोज पाटील सर हे उपस्थित होते.
पळासनेर गावातील प्रतिष्ठित डॉ रमेश पाटील, डॉ सुनील पाटील, विजय जमादार,अमोल परदेशी, नरेंद्र जमादार, योगेश वाणी यांनी स्टॉलला भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाची रूपरेषा तसेच NILP कार्यक्रम समजून घेतला.
केंद्रप्रमुख नंदकिशोर पाटील सर यांनी आभार मानले