तऱ्हाडी विद्यालयात शिक्षण सप्ताहाला सुरुवात
तऱ्हाडी:-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै२०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी स्व. अण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे २२जुलै २०२४ रोजी शिक्षण सप्ताह निमित्ताने अध्ययन अध्यापन साहित्य दिवसाला सुरुवात करण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांना चला शिकूया.
चला गोष्टी ऐकू या. डोके चालवा .वाचन कट्टा. प्राण्यांचे व पक्षांचे मुखवटे. खेळणी इत्यादी उपक्रम राबवून शिक्षक प्रविण शिंदे व संतोष आडगाये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वस्तू तयार केलेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण जेष्ठ शिक्षक भरत मराठे वसंत पाटील.अनिल पाटील. निता पाटील . कुमुदिनी मराठे.भावेश पाटील यांनी सहकार्य केले व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला