तऱ्हाडी विद्यालया तर्फे इको क्लब मार्फत
एक पेड मां के नाम या उपक्रमाअंतर्गत शंभर वृक्ष लागवड
प्रत्येकाने दरवर्षी एकतरी झाड लाऊन त्याचे संगोपण करावे- उपक्रम शिल शिक्षिका उज्ज्वला भामरे यांचे प्रतिपादन
त-हाडी:- शिक्षण सप्ताह निमित्ताने तऱ्हाडी विद्यालयात इको क्लब स्थापन करण्यात आले या मार्फत एक पेड मां के नाम या उपक्रमाअंतर्गत तऱ्हाडी गावात शंभर वृक्षाची लागवड केली हा उपक्रम येथील शिक्षिका व संचलीका उज्ज्वला भामरे व वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला वातावरणात होणारे बदल,पर्यावरणाचा होणारी हानी ,वृक्ष लागवडी अभावी होणारी वृक्षतोड हा चितेंचा आणि चिंतनाचा विषय असुन वसुधंरेचे संवर्धन करने काळाची गरज आहे.
त्यासाठी प्रत्येकाने संकल्प करुन वृक्ष लागवडीसह त्यांचे संगोपनाचे दायित्व सर्वांनी स्विकारले पाहीजे तर वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज झालेली असुन नुसती वृक्षाची लागवड करुन भागणार नाही तर आपल्या हातुन त्यांचे संगोपन होऊन ते वृक्ष अनंत काळ जिवंत राहावे यासाठी प्रयत्न केले पाहीजे तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा उदांत हेतु मनात ठेवुन प्रत्येक व्यक्तींने दरवर्षी एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन करावे असे प्रतिपादन स्व.आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयाचे उप शिक्षिका उज्ज्वला भामरे यांनी केले
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे .मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण माजी मुख्याध्यापक अशोक सोनवणे पालक दिलीप कोळी, ऐ के पाटील, संतोष आडगाये भावनेश सोनवणे व्हि डी पाटील प्रविण शिंदे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना भामरे म्हणाले की भविष्यात कुणीही वृक्ष तोड करणार नाही व यासाठी आम्ही सर्वांनी जागृत रहावे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण म्हणाले की सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील शिरपूर बोराडी, दहिवद यासह विविध ठिकाणांहून
कांचन,कारंजी चिंच,बांबु,सिताफळ ,निंब यासह आदी वृक्षांची रोपे उपलब्ध होत असतात तसेच यावर्षी देखील
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना वेगवेगळ्या रोपांची वाटप केली जातात प्रत्येक ग्रामपंचायतीने या वृक्षांचे संगोपन करुन ते वाढवावे त्याची निगा घेऊन त्यांची आपल्या लेकरा समान काळजी घ्यावी मत व्यक्त केले
यावेळी विद्यालयाच्या परीसरात व गावात ,पिंपळ शिसव ,लिंब आवळा यासह विविध उच्च प्रतिच्या वृक्षांची लागवड करण्यात आली..
फोटो:-कै आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालयातील उप शिक्षिका उज्ज्वला भामरे, गावातील माता पालक मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण प्रविण शिंदे. देवीदास मोरे भावनेश सोनवणे व इतर