अभानपुर ते त-हाडी रस्त्याची एक महिन्यात चाळणी ते त-हाडी रस्त्याची एक महिन्यात चाळणी ते त-हाडी रस्त्याची एक महिन्यात चाळणी
निकृष्ट कामाचा रस्ता ठरतोय उत्कृष्ट नमुना; नागरिकांमधून नाराजी
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी ते अभानपुर दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम सध्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट दर्जा असेच मानले जात आहे. कारण अवघ्या एक महिन्यात ठिकठिकाणी रस्ता उखडला असून रस्त्याची चाळणी झाली आहे.
हे काम लाखो रुपयाचे असून पाच किलोमीटरच्या मजबुतीकरण व डांबरीकरणावर लाखो रुपयांचा खर्च झाला, बऱ्याच वर्षानंतर या भागातील नागरिकांची रस्त्याची मागणी पूर्ण झाली होती. रस्त्याचे मजबुतीकरण करत असताना योग्य प्रकारे दबईचा व गिट्टीचा वापर न करणे, पाण्याचा वापर न करणे यासह निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळेच ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. मे महिन्यात झालेले मजबुतीकरण अवघ्या एका महिन्यात चाळण झाले आहे. विशेष म्हणजे संबंधित रस्त्यावर डांबराचे कार्पेट करण्यात आले नव्हते. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच हा रस्ता ठिकठिकाणी फुटला आहे. एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करीत असताना संबंधित ठेकेदार, अधिकारी सोयीस्करपणे कॉन्ट्रॅक्टरकडे दुर्लक्ष करत कामे करीत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात रस्त्याची दुरावस्था होऊन वाहनधारकांचा शाळकरी मुलांचा पुन्हा खडतर प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया
शिरपूर तालुक्यातील त-हाडी ते अभानपुर हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या रस्त्याच्या कामाच्या मागण्या होत्या. रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले, मात्र एक महिन्यात रस्त्याची अशा प्रकारे चाळणी झाली.
-नरेद्र भाईदास सोनवणे सामाजिक कार्यकर्ते
त्रयस्त गुण नियंत्रकाकडून तपासणी व्हावी
शिरपूर तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाच्या या भागातील गुण नियंत्रकांकडून तपासणी करण्यात यावी. अतिशय निकृष्ट, दर्जाहीन कामे झाली आहेत. • याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने वाहनधारक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
राजकारण्यांना हवे मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर
इतर रस्त्यांचीही अशीच अवस्था
- शिरपूर तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डांबरीकरणाची जी कामे करण्यात आली त्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत. • निकृष्ट दर्जाचे डांबर वापरणे, दबाई व खडीकरण निकृष्ट करणे, साईडची माती मुरुम म्हणून वापरणे साईट नाल्या न करणे यामुळे तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे.
- शिरपूर तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम करणारे कॉन्ट्रॅक्टर हे वर्षानुवर्ष याच तालुक्यातील कामे करीत आहेत. परिणामी, संबंधित राजकीय नेते व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांची मर्जी राखण्यात हे ठेकेदार कमी पडत नाहीत. यामुळेच शिरपूर तालुक्यातील कामाची वाट लागली आहे.