संततधार पावसाने खरीप पिके धोक्यात त-हाडी परिसरात पंधरा दिवसापांसून सूर्यदर्शन नाही; पिके पिवळी पडली..
त-हाडु : शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात मागील १० ते १५ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. पंधरा दिवसापासून सुर्यदर्शन झालेले नसल्यामुळे याचा विकांना मोठा फटका बसत आहे. रोजच्या रिमझीम पावसाने मका,भूईमुग, मूग, तूर पिवळे पडत आहेत. कपाशी पिकावर मर रोग पडत आहे.परिसरात अद्याप एकाही दमदार पाऊस नाही, नद्या, तलाव कोरडे आहेत. एकीकडे ही परिस्थिती असतानाही रोजच्या संततधार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
यावर्षी मृग नक्षत्रात सुरुवातीस पावसाने हजेरी लावली. यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणीला सुरुवात झाली. एकही मोठा पाऊस झाला नसला तरी अधुन मधुन पडणान्या रिमझीम पावसाने पिके जोमात वाढली आहे. यावर्षी मोठा पाऊस नसला तरी पिके जोमात असल्यामुळे शेतकरी खुश होते. परंतू मागील पंधरा दिवसपासून सुर्यदर्शन नाही. रोज संततधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे जोमात आलेली खरीप पिके पिवळी पडत आहेत. मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतक-यांनी फवारणी केली पण पावसाची उघडीप नसल्याने फवारणीचा परिणाम झाला नाही. मागील १० ते १५ दिवसांपासून त-हाडी परिसरात संततधार पाऊस सुरूच आहे. सूर्यदर्शनच नसल्यामुळे पिकांना उन मिळाले नाही. यामुळे खरीपातील मका, भूग,भुईमूग , तूर, ही पिके पिवळी पडत आहेत. रोजच्या पावसामुळे त्यांची मुळे कुजत आहेत. तसेच ढगाळ वातावरण असल्याने किडीचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढला आहे. मात्र संततधार पाऊस असल्याने फवारणी देखील करता येत नाही. गतवर्षी मुबलक पाऊस झाला नसल्याने कपाशीच्या पिकाला मोठा फटका बसला होता. यावर्षी योग्य वेळी पाऊस पडल्याने त-हाडी परिसरात ५० टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड झाली आहे. योग्य नियोजन व पोषक वातावरणामुळे कपाशी जोमात आहे. मात्र रोजच्या संततधार पावसामुळे कपाशी पिके पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
त-हाडी परिसरात सततच्या पावसामुळे कपाशी पिकात मवा..
रोगाचे प्रमाण वाढले आहे. परंतू मर नियंत्रणासाठी शेतातील साचलेले पाणी काढून द्यावे. दीड किलो युरिया, दीड किलो पोटॅश, कॉपर ऑक्सीक्लोराईड १०० लिटर पाण्यात मिसळून मर लागलेल्या झाडापाशी टाकावे. १९:१९ हे विद्राव्य खत व बांगल्या कंपनीचे युमिक मिसळून फवारणी करावी. याव्यतिरिक्त काही अडचण आल्यास कृषी विभाग शिरपूर यांच्याशी संपर्क साधावा
संजय पवार जनमाहीती आधिकारी तथा तालूका कृषी अधिकारी शिरपूर
मागील पंधरा दिवसापासून रिमझिम पावसामुळे शेतात अंतर्गत मशागतीचे कामे होत नाहीत. रिमझिम पावसामुळे मका, कापूस पिकावर फवारणी करता येत नाही. फवारणीया योग्य परिणाम पावसामुळे होत नाही. शेतामध्ये पाणी होऊन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रिमझिम पावसामुळे पंधरा दिवस झाले सूर्य सुदर्शन झाले नाही. पिकांवर विविध रोगाचा प्रभाव वाढला आहे.
धनराज पाटील