भाजपा जैन समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष
गणेश जैन यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
भाजपा जैन समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष
गणेश जैन यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
जैन धर्मियांचे पवित्र पर्युषण महापर्वाच्या कालावधीत
शिरपुरात मटन विक्री दुकाने बंद ठेवा
भाजपा जैन समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष
गणेश जैन यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
शिरपूर : जैन धर्माच्या पवित्र पर्युषण महापर्वास ३१ ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. ९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या पर्वाचे पावित्र्य राखण्यासाठी या काळात शिरपूर शहरासह परिसरातील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जैन समाज प्रकोष्ठ ( आघाडी )चे जिल्हाध्यक्ष गणेश जैन (बळसाणेकर) यांनी केली आहे. याबाबत दि. २२ रोजी शिरपूर प्रांताधिकारी शरद मंडालीक यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना गणेश जैन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जैन धर्माच्या पवित्र पर्युषण महापर्वास ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. ९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे हा आठ दिवसाचा सण असून जैन धर्मियांसाठी अतिशय महत्वपूर्ण पर्व आहे. जैन समाज हा अहिंसावादी असून चार्तुमास मध्ये येणारा पर्युषण महापर्व हा सण जैन समाजबांधव मोठ्या उत्साहाने हिंसा न करता साजरा करीत असतात. म्हणून या कालावधीत हिंसा न होण्याच्या दृष्टीने मटन विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेशित करून शिरपूर शहरातील सकल जैन समाज बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकार गणेश जैन यांनी केले आहे