आटपाडी प्रतिनिधी
खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या विकासासाठी माझी उमेदवारी आहे असे विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले देशमुख यांनी आटपाडी येथे बोलताना मांडले यावेळी ते म्हणाले 1995 ची पुनरावृत्ती होईल व माझा विजय निश्चितपणे होईल खानापूर मतदारसंघातून प्रमुख तिरंगी लढत होणार आहे.
महायुतीचे उमेदवार सुहास अनिलराव बाबर,महाविकास आघाडीचे उमेदवार वैभवदादा सदाशिव पाटील आणि अपक्ष माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख या प्रमुख उमेदवारांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार आहे. मतदार संघात चौरंगी लढत होईल असे चित्र होते मात्र शेवटच्या क्षणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला.त्यामुळे खानापूर आटपाडी मतदार संघात प्रमुख तीन उमेदवारां मध्ये चुरशीची लढत होणार आहे.
खानापूर मतदार संघात निवडणूक लढवणारे अंतिम उमेदवार आणि त्यांना वाटप करण्यात आलेले चिन्ह:-
1. अजित धनाजी खंदारे- हत्ती 2. बाबर सुहास अनिलभाऊ – धनुष्यबाण 3. राजेश रामचंद्र जाधव- रेल्वे इंजिन 4. वैभव सदाशिव पाटील- तुतारी वाजवणारा माणूस 5. संग्राम कृष्णा माने- गैस सिलिंडर 6. भक्तराज रघुनाथ ठिगळे- बॅट 7. उमाजी मोहन चव्हाण- शिट्टी 8. भरत जालिंदर पवार- नागरिक 9. राजेंद्र आण्णा देशमुख- ऑटो रिक्षा 10. दादासो कोंडिराम चंदनशिवे- ट्रम्पेट 11. अंकुश महादेव चवरे- टेबल 12. उत्तम श्यामराव जाधव- हार्मोनियम 13. संभाजी जगन्नाथ पाटील- मोत्यांचा हार 14. संतोष सुखदेव हेगडे- लिफाफा.